ओडिसामध्ये (Odisha) शुक्रवारी घडलेल्या भीषण अपघातामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेमुळे बऱ्याच लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही दुर्घटना कशी झाली त्याचं सत्य समोर आल आहे. मालगाडी आणि एक्सप्रेसगाडी यांच्यामध्ये धडक झाल्याची बातमी समोर आली आहे. पण यामुळे अपघातामध्ये तीन रेल्वे गाड्यांचा अपघात झाल्याचीही माहिती समोर आली आहे. हा भीषण अपघात अंगाचा थरकाप करणारा आहे. या भीषण अपघातातील दृश्य पाहून संपूर्ण देशामध्ये शोककळा पसरली आहे.
ओडिसामध्ये झालेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 280 लोक मृत्युमुखी पडली आहेत. तर 900 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी आहेत. जखमी लोकांना वाचवण्यासाठी अटातटीचे प्रयत्न चालू आहेत. परंतु मृत्यूचे प्रमाणं वाढतचं चाललंय. शुक्रवारी झालेल्या या घटनेची दखल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी घटनास्थळी जाऊन घेतली. त्यांनी तातडीने या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
या भीषण अपघातात हावडाला जाणाऱ्या 12864 बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट रेल्वेचे बरेच डबे बहानगा बाजारच्या रुळावरून घसरले आणि दुसऱ्या रुळावर जाऊन पडले. घसरलेले डबे 12841 या शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला जाऊन धडकले व कोरोमंडलचे डबे देखील तिथेच उलटेपालटे झाले. कोरोमंडलचे डबे जाऊन मालगाडीला धडकले आणि त्यामुळे मालगाडीचाही भीषण अपघात झाला.
Ambani House Visit | फक्त २ रुपयात अंबानींचे घर पाहण्याची सुवर्णसंधी; कसं ते जाणून घ्या
अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे संध्याकाळच्या 7 च्या सुमारास हा भीषण अपघात घडला होता. तर दुसऱ्या अधिकाऱ्याने अशी माहिती दिली आहे की, पहिल्यांदा कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली आणि तिचे दहा-बारा डबे बेंगळुरू- हावडा एक्सप्रेसच्या रुळांवर पडले आणि त्यानंतर मालगाडीचा अपघात झाला.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांना या अपघाताचे कारण विचारल्यास त्यांनी अशी माहिती दिली आहे की, “या भीषण अपघाताचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. परंतु, त्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या भीषण अपघातात कोणाची चूक असेल त्याला सोडलं जाणार नाही. मी स्वतःहा या प्रकरणाच्या तळाशी जाणार आहे. जोपर्यंत याचं खरं कारण समोर येत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही”. अशी माहिती अश्विनी यांनी दिली आहे.
सर्वसामान्यांसाठी गुडन्यूज! एलपीजी गॅसचे दर झाले कमी, जाणून घ्या नवीन दर