
आपल्या आवडत्या कलाकारांच्या लग्नाबद्दल आपण नेहमीच उत्सुक असतो. त्यातल्या त्यात एखादी ऑनस्क्रीन वरची जोडी ऑफस्क्रीन वर सुद्धा प्रत्यक्षात एकत्र लग्नगाठ बांधत असेल तर सोने पे सुहागा ! झी मराठी वरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणा दा व पाठक बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर ( Akshaya Devdhar) व अभिनेता हार्दिक जोशी ( Hardik Joshi) लवकरच लग्न करणार आहेत. यामुळे प्रेक्षक वर्ग आनंदात आहे.
बारामतीमधील भिगवण रोडवर पत्रकारावर गोळीबारप्रकरणी पाच जणांना अटक
तुझ्यात जीव रंगला ( Tuzyat jeev rangla) ही मालिका बंद झाली असली तरी आजही लोक राणा दा व पाठक बाई या जोडीवर भरभरून प्रेम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांचा साखरपुडा झाला असून सध्या त्यांच्या लग्न पत्रिकेचा फोटो समोर आला आहे. यामध्ये लग्नपत्रिकेवर चांदीचा विडा ठेवलेला दिसतोय. यामुळे त्यांची लग्नपत्रिका प्रचंड चर्चेत आली आहे.
अक्षया व हार्दिक यांच्या लग्नपत्रिका पांढऱ्या रंगाची आहे. यावर त्या दोघांची नावे लाल रंगात लिहिलेली दिसत आहेत. लग्नपत्रिकेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षया आणि हार्दिकनं पत्रिकेवरील आपली नावे मराठीत लिहिली आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात हे दोघेही लग्न करणार असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
Gautami Patil: गौतमी पाटीलच्या एका शोचं मानधन ऐकून व्हाल थक्क; वाचा सविस्तर