
पुणे: अपघाताच्या घटना आपल्यासाठी नवीन नाहीत. राज्यात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतो. मात्र रविवारी पुण्यातील नवले पुलावर ( Navle Bridge) झालेला अपघात ( Accident) थरकाप उडवणारा होता. या अपघातात एका कंटेनरच्या धडकेत जवळपास 24 वाहनांचा चक्काचूर झाला आहे.
मानसी नाईकच्या नवऱ्याबद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का? वाचा सविस्तर
या अपघातात कंटेनरने मागून येऊन वाहनांना धडक दिली होती. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला असल्याचे प्राथमिक अहवालात म्हंटले गेलं होते. परंतु याप्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. त्यानुसार कंटेनर हा उरतारावर न्यूट्रल करून गाडी चालवत होता. त्यामुळे त्याला गाडी कंट्रोल करता आली नाही असे सांगण्यात येत आहे.
तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सफाई कामगाराने केला बलात्कार
कंटेनर च्या या धडकेत अनेक कार, दुचाकी व रिक्षांचा चक्काचूर होऊन तब्बल तेरा जण जखमी झाले होते. यावेळी अपघात होताच कंटेनरचालक कंटेनर सोडून घटनास्थळावरून पळून गेला होता. यावेळी अपघातस्थळाची पाहणी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) उपस्थित राहिल्या होत्या.
मोठी बातमी! पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राविरोधात पुन्हा एकदा आरोपपत्र दाखल
खरंतर कंटेनर चालकाने उतारावर गाडीचे इंजिन बंद केल्याने योग्य वेळेस त्याला गाडी कंट्रोल करता आली नाही आणि हा भयानक अपघात झाला. चालकाच्या मस्तीने हा अपघात होऊन एवढे मोठे नुकसान झाले आहे. 24 गाड्याचे नुकसान व 13 लोकांच्या जखमी होण्याने या अपघाताला भयानक वळण भेटले आहे.
महत्वाची बातमी! कोरोनातील मयताच्या कुटुंबाला मिळणार कर्जमाफी?