श्रीगोंदा: ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर राज्यसरकारने नुकत्याच त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सध्या राज्यातील बहुतेक कारख्यान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू झाला आहे. यामध्येच आता श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील श्री. साईकृपा शुगर अँड अलाईड इ.लि हिरडगाव युनिट.२ साखर कारखाण्याच्या गळीत हंगामाचा माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते शुभारंभ झाला आहे.
मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याने नरेंद्र मोदींची तुलना केली रावणाशी
यामध्ये कारखाना व्यवस्थापनाने उसाला २७०० रुपयांचा एकरकमी दर देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचा ऊस दर श्रीगोंदा तालुक्यात एक नंबर राहणार
दरम्यान, राज्यात आतापर्यंत सुमारे २८४ लाख टन उसाचे गाळप होऊन २५२ लाख क्विंटल साखर उत्पादन ( Sugar Production) झाले आहे. यासाठी दररोज सरासरी आठ लाख टन क्षमतेने गाळप सुरू आहे. याबाबतची माहिती साखर आयुक्तांनी दिली आहे.