गडचिरोली: आज (1ऑक्टोबर) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) म्हणून जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीत गडचिरोलीतील (Gadchiroli) प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर (Meeting) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस म्हणाले की, ” गेल्या काही दिवसांपासून गडचिरोलीसारख्या नक्षल भागात पोलिसांच्या (Gadchiroli police) दीडपट वेतनाचा प्रश्न प्रलंबित आहे. परंतु येत्या सोमवारपर्यंत त्यासंदर्भातील शासन आदेश गडचिरोलीत पोहोचेल.”
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मेडिगट्टा संदर्भात ज्या शेतकर्यांच्या जमिनी पाण्याखाली जातात, त्यांचे अधिग्रहण करून जमीनीचे मूल्यांकन, तसेच झाडे असतील त्यासाठी वेगळे पॅकेज आणि आवश्यकता असेल तर सानुग्रह अनुदान अशा प्रकारे सर्वंकष पॅकेज तयार करण्यास सांगण्यात आले आहे. इतकंच नाही तर कोन्सरी प्रकल्पाला देखील गती देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण येथील खनिज फक्त बाहेर नेऊन चालणार नाही, तर गडचिरोलीत त्या खनिजांचे प्रक्रिया उद्योग सुद्धा असला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे या उद्योगातूनच स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, अशी आत्ताच्या सरकारची भूमिका आहे अस फडणवीस म्हणाले.
विकासाच्या संदर्भात सर्व अधिकार्यांना सूचना केल्या आहेत. गडचिरोलीचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील. मंत्रालय स्तरावर जे प्रश्न आहेत, त्यासंदर्भात लवकरच मंत्रालयात एक बैठक घेण्यात येईल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस#DevendraFadnavis in #Gadchiroli pic.twitter.com/A9EihhXFub
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) October 1, 2022
कोन्सरी या प्रकल्पाचा एप्रिलपर्यंत पहिला टप्पा होईलच पण पुढच्या विस्तारालादेखील आम्ही लवकरच मान्यता देऊ. महत्वाची बाब म्हणजे या प्रकल्पात 18 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.तयामुळे येथील एमआयडीसीला अतिरिक्त जागा द्यायला सांगण्यात येईल. विशेष म्हणजे या कोन्सरी प्रकल्पामुळे स्थानिक विकासाला मोठी गती मिळणार आहे.म्हणून या प्रकल्पासाठी राज्य सरकारतर्फे संपूर्ण मदत करण्यात येईल.आणि या मदतीतून सगळ्या अडचणी दूर करण्यात येतील.”, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुलींना मांडीवर बसवून शिक्षक करायचा ‘हे’ काम, पालकांनी चप्पलचा हार घालत संपूर्ण गावात काढली धिंड
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, “वाहतुकीमुळे नागरिकांना बऱ्याच अडचणी येतात. या येणार्या अडचणी दूर करण्यासाठी ‘मायनिंग कॉरिडॉर’ तयार करण्यात येणार आहे आणि त्यावरूनच वाहतूक होईल. दरम्यान या ‘मायनिंग कॉरिडॉर’चा आराखडा लवकरच तयार करण्यात येईल.”, असेही ते म्हणाले. गडचिरोलीत आयोजित केलेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गडचिरोलीचे खा.अशोक नेते, आ.देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, आ. धर्मरावबाबा आत्राम, आ.अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक, मुख्य वनसंरक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, इतर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
Nagaraj Manjule: या दिवशी येणार नाळ चित्रपटाचा दुसरा भाग,नागराज मंजुळेंनी शेअर केली पोस्ट