मागील काही दिवस पुण्यात कसबा चिंचवड ( Kasba & Chinchwad Assembly Elections) पोटनिवडणुकीचे वारे वाहत आहे. उमेदवार जाहीर केल्यानंतर झालेली नाराजी, नंतर दणक्यात झालेला प्रचार आणि शेवटी आचारसंहिता भंग झाल्याचे आरोप यामुळे ही निवडणूक प्रचंड गाजली. या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. भाजप व मविआसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मात्र निकाल जाहीर होण्याआधीच कालपासून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचे फ्लेक्स लागले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. “धंगेकर कोण आहेत ? ( Who is Dhangekar? ) कसबा तो झाकी हैं, कोथरूड अभि बाकी हैं” असा मजकुर असलेले फ्लेक्स कसबा मतदारसंघात लावण्यात आले आहेत.
यंदा बारावीचा निकाल उशिरा लागणार? शिक्षकांनी टाकला उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार
त्याच झालं असं होतं की, कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी who is dhangekar ? (धंगेकर कोण आहेत ? ) असा प्रश्न भरसभेत विचारला होता. यामुळे चंद्रकांत पाटील यांना डिवचण्यासाठी हे फ्लेक्स लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने हे फ्लेक्स लावले आहेत. सध्या पुण्यात याच फ्लेक्सची जोरदार चर्चा सुरू आहे.
संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “…तर ते चुकीचे आहे”