ज्याच काम दमदार तोच आमदार! ब्राम्हण केंद्रित पेठांमध्येच भाजपला मोठा धक्का

मागील काही दिवसांत पुण्यात कसबा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे (Assembly Elections 2023) वारे वाहत आहे. भाजप व महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरली असून नुकताच कसबा विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला असून भाजपचे हेमंत रासने पराभूत झाले आहेत. या निकालाने भाजपला ( BJP) मोठा धक्का बसला आहे.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! कसब्यातून रवींद्र धंगेकरांचा विजय

खरंतर कसबा मतदारसंघात मागच्या 28 वर्षांत भाजपचे वर्चस्व होते. सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि शनिवार पेठ या मूळ ब्राम्हणकेंद्रीत पेठांमध्ये या निवडणुकीत भाजपला अक्षरशः डावलले गेले आहे. जवळजवळ मागील अनेक वर्षांचा इतिहास मोडीत काढत महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकरांनी कसबा मतदारसंघात ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

कसब्याच्या फक्त दोन फेऱ्या बाकी; धंगेकर आघाडीवर, कार्यकर्त्यांनी केली गुलालाची उधळण

दरम्यान रवींद्र धंगेकर यांच्या यशानंतर कसब्यातील मतदारांनी ‘ज्याच काम दमदार तोच आमदार’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया माध्यमांना दिल्या आहेत. ‘जर उमेदवार काम करणारा आणि प्रामाणिक असेल तर पक्षीय राजकारण कामी येत नाही’. हे या निवडणुकीने दाखवून दिल असल्याचं कसब्यातील मतदार म्हणत आहेत.

भाजपच्या हातातून कसबा निसटणार? रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यात कोण आघाडीवर? वाचा एका क्लीकवर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *