
आपला भारत देश कितीही विकसित झाला असला तरी देशात आजही महिला सुरक्षित नाहीत. देशात रोज कुठे न कुठेतरी महिलेचा विनयभंग किंवा बलात्काराची घटना घडत असते. अगदी चिमुकल्या मुलींच्या बाबतीत देखील असे प्रकार घडतात. दिल्लीमधील ( Delhi) एका शाळेत अवघ्या ४ वर्षाच्या मुलीसोबत विनयभंगांचे कृत्य केल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ( Peon molest 4 year old girl in school)
देशाची राजधानी दिल्लीमध्ये शाळेत शिकणाऱ्या एका चार वर्षाच्या मुलीचा विनयभंग त्याच शाळेतील शिपायाने केला आहे. या शिपायाचे नाव सुनील कुमार असून तो ४३ वर्षाचा आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुनील कुमारने मंगळवारी (दि.९) शाळेत खेळत असणाऱ्या मुलीचा विनयभंग केला.
Buisness | शेण विकून ‘तो’ दर महिन्याला कमावतो १० लाख! तरुणाचा भन्नाट स्टार्टअप प्लॅन एकदा वाचाच
दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी शाळेतून घरी आलेल्या मुलीला आई अंघोळीला घेऊन गेली. त्यावेळी घाबरून त्या मुलीने तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावू दिला नाही. मुलीच्या अशा कृतीमुळे आईला शंका आली. म्हणून आईने मुलीकडे प्रेमाने विचारपूस केली. यावेळी मुलीने धक्कादायक माहिती दिली. शाळेत खेळताना मिशी असलेल्या काकांनी तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावल्याचे मुलीने आईला सांगितले. दरम्यान याबाबतची माहिती मुलीच्या आईवडिलांनी पोलिसांनी दिली. यावेळी आरोपीवर IPC आणि POCSO कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ajit Pawar | ‘ती’ आमची सर्वात मोठी चूक; सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अजित पवारांचा मोठा खुलासा!