Site icon e लोकहित | Marathi News

अधिवेशनाला आजपासून सुरूवात, संपूर्ण महाराष्ट्राचे ‘या’ मुद्द्यांकडे लक्ष

The session starts from today, the attention of entire Maharashtra towards 'these' issues

आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Monsoon sessions) सुरुवात होणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांचे हे पहिले अधिवेशन असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील (Nationalist Congress Party) दोन्ही गटाकडून एकमेकांना व्हीप लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अधिवेशनच्या पहिल्याचे दिवशी राष्ट्रवादीतील दोन गटात संघर्ष पाहायला मिळेल. तसेच विरोधक सत्ताधारी पक्षांना घेराव घालू शकतात. (Latest Marathi News)

Rohit Pawar | धक्कादायक! रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

त्यामुळे आता हे अधिवेशन (Maharashtra Monsoon Sessions) सत्ताधारी की विरोधक गाजवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आजपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार? कोणत्या विषयांवर चर्चा होणार? जाणून घेऊया सविस्तर.

ब्रेकिंग! अधिवेशन सुरु होण्यापूर्वी मंत्रिमंडळात मोठा बदल, एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारी खाती दिली इतर मंत्र्यांना

पावसाचा कहर सुरूच! कुठे वाहने बुडाली, तर कुठे रस्त्याला भले मोठे खड्डे पडले

या मुद्द्यांवरून अधिवेशन गाजू शकते. मागील वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेमध्ये बंड करत भाजपसोबत (BJP) युती केली. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड करत भाजपसोबत युती केली. राज्यात आता तीन पक्षाचे सरकार आले आहे. नाट्यमय घडामोडीनंतर या सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे आता या अधिवेशनात सत्ताधारी विरोधकांवर भारी पडणार की विरोधक सत्ताधाऱ्यांवर भारी पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Katrina kaif Birthday | कधीच शाळेत न जाणारी कतरिना आज घेते बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त मानधन

राज्यातील सरकार हे घटनाबाह्य आणि कलंकित आहे असे म्हणत विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला. अशातच आता अजित पवार गट सत्ताधारी आणि विरोधकांच्या आसनव्यवस्थेवरून नवीन पेच निर्माण झाला आहे.

Seema Haider । पाकिस्तानी डॉक्टरने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, सीमा हैदरची मेडिकल टेस्ट करा तिला..

Spread the love
Exit mobile version