Site icon e लोकहित | Marathi News

शिंदे-फडणवीस सरकार अखेर शेतकऱ्यांना पावले; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय

The Shinde-Fadnavis government has finally stepped up to the farmers; 'These' big decisions were taken in the cabinet meeting

मागील काही दिवसांत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार नाही असा आरोप विरोधकांकडून केला जात होता. या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.

उदयनमहाराजांचा हल्लाबोल; म्हणाले,”… ही महाराजांची अवहेलना नाही का?”

दरम्यान, या बैठकीत शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी ( FRP) देण्याचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांच्या मालात होणारी काटेमारी टाळण्यासाठी पुढील हंगामापासून डिजिटल वजनकाटे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी यासाठी ‘कृषी फिडर सौरऊर्जेवर करण्याचा प्रकल्प’ हाती घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर

शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी घेण्यात आलेल्या या बैठकीमध्ये नैसर्गिक आपत्तीत ( अतिवृष्टीमध्ये) नुकसान झालेल्या व पीकविमा योजनेचा हप्ता भरला आहे, अशा शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याचे निर्देश कृषीमंत्री यांनी दिले आहेत. तसेच नंदुरबार जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पाच्या 169.14 कोटी खर्चास सुधारित मान्यता व 3659 हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ मिळणार असल्याची खुशखबर देखील यावेळी देण्यात आली.

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज; म्हणाले, “माध्यमांसमोर माझ्याशी चर्चा करून दाखवावी”

Spread the love
Exit mobile version