Site icon e लोकहित | Marathi News

शिंदे सरकारने शेतकऱ्यांना दिला मोठा दिलासा

The Shinde government gave a big relief to the farmers

शेती हा निसर्गावर चालणारा व्यवसाय आहे. यामध्ये शेतकऱ्यांना अनेक चढउतार सहन करावे लागतात. यंदाच्या खरीप हंगामात ( Kharip Season) राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ( Heavy Rainfall) शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. यामध्ये मुख्यतः कापूस, सोयाबीन, तूर यांसारख्या पिकांचे नुकसान झाले. दरम्यान शेतकऱ्यांना ( Farmers) बराच मोठा आर्थिक फटका देखील सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांना नुकतीच मदत जाहीर केली होती. मात्र या शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यसरकारने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेत आता प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे.

अजित पवारांचा सरकारवर निशाणा; साहित्य क्षेत्रातील हस्तक्षेपावर दर्शवला निषेध

राज्याच्या महसूल व वनविभागाने शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या बाधित शेतकऱ्यांसाठी नवीन निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून पीके आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी 222 कोटी 32 लाख 45 हजार रुपये इतका निधी वितरीत करण्यास शिंदे-फडणवीस सरकारने मंजूरी दिली आहे.

हिवाळ्यात गुळ खाण्याचे फायदे; या आजारांतून होते सहज सुटका!

अशी मिळणार मदत

1) जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रुपयांऐवजी आता 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत.

2) बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 ऐवजी आता 27 हजार रुपये मिळणार आहेत.

3) बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी 36000 मिळणार आहेत.

4) दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत मिळणार.

कापूस उत्पादक होणार आता मालामाल! महाराष्ट्रात राबविला जाणार ‘हा’ उपक्रम

Spread the love
Exit mobile version