काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी केलेल्या मोठ्या राजकीय बंडानंतर शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट यामध्ये विभागली गेली. तेव्हापासून शिवसेना नक्की कुणाची यावर वाद सुरू आहेत. तसेच धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार हे सुद्धा अजूनही स्पष्ट झाले नाही. आज यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान संजय राऊतांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
धक्कदायक! कुत्र्याने डिलिव्हरी बॉयचा घेतला जीव; “थेट तिसऱ्या मजल्यावरून…”
संजय राऊत म्हणाले, मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये चिन्हांवरून वाद सुरु आहे. मात्र शिवसेना कोणाची हा प्रश्न नाही. कारण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जी शिवसेना आहे तीच खरी शिवसेना अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भीषण अपघातानंतर ऋषभ पंतने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, “मी सगळ्यांचा…”
दरम्यान, उध्दव ठाकरे ( Uddhav Thackeray) हे येत्या 13 जानेवारी पर्यंत शिवसेनेचे पक्षप्रमुख असणार आहेत. त्यानंतर त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपतोय. मात्र सत्ता संघर्षाचा कायदेशीर पेच संपेपर्यंत उद्धव ठाकरे यांना मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर आज सुनावणी होणार आहे.
काळाने घातला घात! दोन सख्ख्या बहिणींचा विहरीत बुडून मृत्यु
या दरम्यान निवडणूक आयोगाने संघटनात्मक निवडणुकांना परवानगी दिली तर वेगळीच शक्यता निर्माण होत आहे. परिणामतः शिवसेनेच्या घटनेनुसार ठाकरे गटाचं अस्तित्व मान्य केल्यासारखं होईल. त्यामुळे या मागणीवर निर्णय देताना निवडणूक आयोग एकतर उद्धव ठाकरेंना मुदतवाढ देईल किंवा त्याआधीच काही मोठा निर्णय घेतला जाईल. यामुळे आजचा दिवस निर्णयाक ठरणार आहे.
शिवसेना कुणाची? आज निर्णय होण्याची शक्यता; निवडणूक आयोग देणार महत्त्वाचा निर्णय