
अकोला: एखाद्या व्यक्तीचा मृत्यू (death) झाल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांना खूप दु:ख होतं. अंत्यसंस्कारसाठी (the funeral)आणि त्या व्यक्तीला शेवटचा निरोप देण्यासाठी नातेवाईकासह (relatives) अनेक जण येतात. पण अचानक ती गेलेली व्यक्ती जीवंत झाली तर काय होईल. हे ऐकल्यावर तुम्हाला खरं वाटणार नाही. पण ही घटना अकोल्यातून (Akola) समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सर्वत्र चर्चा होत आहे. पण आता या घटनेमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. या घटनेमध्ये अंधश्रध्देचा (superstition) कळस पाहायला मिळाला आहे.
‘या’ योजनेत करा गुंतवणूक, पाच वर्षात जमा होईल 14 लाखांचा निधी; वाचा सविस्तर
अंत्ययात्रेदरम्यान मी त्याला जिवंत करतो असं म्हणत एका मांत्रिकाने त्याला जिवंत केल्याचा दावा केला यानंतर पोलिसांनी या प्रकरणी प्रशांतच्या कुटुंबियांच्या जबाब नोंदवला आहे. दरम्यान या प्रकरणी आता चान्नी पोलिसानी गणेश महाराज मांत्रिकावर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. शिवाय असे प्रकार पुन्हा घडू नयेत आणि अशा स्वयंघोषित मांत्रिकांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आलं आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातल्या विवरा गावातील प्रशांत मेसरे नामक तरूणाचा मृत्यू झाल्याचे सांगत गावातून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती.
राज्य सरकारचा मोठा निर्णय, पोलिस-तलाठीसह विविध पदांसाठी होणार ७५ हजार पदांची भरती
प्रशांत मेसरे असं मयत झालेल्या आणि मध्येच तिरडीवर उठणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मृत झाला असे सांगत त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी करून त्याला स्मशानभूमीत नेत असताना तरुणामध्ये हालचाल जाणवली अंत्यसंस्कार यात्रा थांबवतच हा तरुण उठून बसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांची पुन्हा होणार दिवाळी, कारण कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देतय ‘हे’ गिफ्ट