देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक (Lok Sabha election) पार पडणार आहे. या पार्शवभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी दिल्लीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली.
मोठी बातमी! IPL चालू असतानाच क्रिकेटर पृथ्वी शॉच्या अडचणींमध्ये वाढ
या बैठकीमध्ये देशातील सर्व विरोधकांना एकत्र येऊन भाजपविरोधात सामना करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. आता पवारांसोबत बैठक झाल्यानंतर राहुल गांधी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्यामध्ये पुन्हा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अजित पवार भाजपसोबत जाणार? भास्कर जाधव म्हणाले…
काँग्रेस नेते राहुल गांधी लवकरच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात या नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट होणार आहे. त्यामुळे यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.