Site icon e लोकहित | Marathi News

राजकीय घडामोडींना वेग! अजित पवार यांनी बोलावली आमदारांची बैठक

The speed of political events! Ajit Pawar called a meeting of MLAs

राजकीय वर्तुळात विविध अफवा आणि चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत (BJP) जाणार अशा चर्चा काही दिवसांपासून राज्यात सुरू होत्या. मात्र खुद्द अजित पवारांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीकाँग्रेस मध्येच राहू असे अजित पवारांनी सांगितले आहे. (Ajit Pawar said that he will stay in NCP till his last breath) दरम्यान, आज राष्ट्रवादीमध्ये वेगवान हालचाली घडताना दिसतायेत.

सरकार कोसळणार? फडणवीसांच्या ‘त्या’ ट्विटनं उडाली खळबळ

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यांचे निवासस्थान असलेल्या देवगिरीवर पक्षाची बैठक बोलावली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या असून अनेक तर्कवितर्क देखील लावले जात आहेत.

बिग ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गायब; दैनिक ‘सामना’तील नेमका दावा काय?

आता या बैठकीमध्ये कशावर चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीमधील काही दिग्गज नेते देखील उपस्थित आहेत.

“गौतमीचा तो व्हिडीओ व्हायरल अन् नेटकरी म्हणाले… ” पाहा Video

Spread the love
Exit mobile version