काल (दि.१३) कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. याठिकाणी काँग्रेसला ( Congress) प्रचंड मतांनी विजय मिळाला आहे. यामुळे विरोधकांना अगामी लोकसभा निवडणुका लढण्यासाठी बळ आले आहे. या निकालाच्या विजयानंतर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर आज (दि.१४) महाविकास आघाडीने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी ही बैठक होत आहे.
Dharmveer Movie | ‘धर्मवीर’ चा दुसरा भाग लवकरच! वर्षपूर्ती निमित्त प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट चर्चेत
महाविकास आघाडीच्या या बैठकीला आघाडीतील सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत मोठे निर्णय घेतले जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज दुपारी चार वाजता ही बैठक होणार आहे. अगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असावा ? यावर या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होईल. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे.
अमोल कोल्हे यांच्यासोबत घडला धक्कादायक प्रकार; चक्क पोलिसांनीच…
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आता फक्त १० महिने उरले आहेत. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यूहरचना आखण्यास तयारी सुरू केली आहे. जागा वाटपामधील मतभेदांमुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडून त्याचा भाजप किंवा इतर मित्र पक्षांना निवडणुकीत फायदा होऊ नये. यासाठी सावधगिरी बाळगत महाविकास आघाडी पाऊले उचलणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.
ICSE Result 2023 | ब्रेकिंग! दहावी, बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, ‘या’ ठिकाणी पाहा निकाल