
मुंबई : वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा टी-20 विश्वचषकासाठी (T20 World cup) भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. स्टँडबाय खेळाडू म्हणूनही त्याला संघात स्थान मिळाले नाही. आता शार्दुल ठाकूरची विश्वचषक संघात निवड न झाल्याने तो नाराज असल्याचे दिसत आहे. शार्दुल म्हणाला की विश्वचषक खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असल्याने तो नक्कीच निराश आहे. पण अजूनही आपल्यात भरपूर क्रिकेट शिल्लक असल्याचं शार्दुलच म्हणणं आहे. शार्दुलने (shardul thakur) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) पहिल्या एकदिवसीय सामन्यात कठीण परिस्थितीत संजू सॅमसनसोबत ९३ धावांची भागीदारी करून सामन्यात भारताचे पुनरागमन केले होते.
पुढच्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट खेळण्याची इच्छा असलेला शार्दुल दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला म्हणाला, ‘साहजिकच ही मोठी निराशा आहे. वर्ल्डकपमध्ये खेळणे आणि चांगली कामगिरी करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. माझी निवड झाली नाही तरी फरक पडत नाही. माझ्यात अजूनही भरपूर क्रिकेट शिल्लक आहे आणि पुढच्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकही आहे. मला कोणत्याही सामन्यात संधी मिळेल, माझे लक्ष चांगली कामगिरी करून संघाच्या विजयात योगदान देण्यावर असेल.
उर्फीचा टॉपलेस व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी घेतला समाचार; पाहा VIDEO
दीपक चहरच्या दुखापतीमुळे भारताच्या T20 विश्वचषक स्पर्धेला मोठा धक्का बसला आहे. दीपक चहरचा समावेश राखीव खेळाडूंच्या यादीत करण्यात आला असून तो आता ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या या विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. शार्दुल म्हणाला, ‘दुखापती हा खेळाचा भाग असतो. कधी कधी खेळाडू जखमी होतो.
शार्दुलने भारतासाठी 58 सामने खेळले आहेत शार्दुलने आतापर्यंत भारतासाठी आठ कसोटी, 25 एकदिवसीय आणि 25 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान शार्दुलने कसोटीत 27, एकदिवसीय सामन्यात 38 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 33 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय, ठाकूरने आयपीएलमध्ये 75 सामने खेळले आहेत आणि 28.54 च्या सरासरीने आणि 18.90 च्या स्ट्राइक रेटने 82 बळी घेतले आहेत.
राज्यात साडेआठ हजार शाळांमध्ये राबवली जाणार ‘पीएमश्री’ योजना, वाचा नेमकी काय आहे ही योजना?