Sarfaraz Khan Marriage । जर तुम्ही क्रिक्रेटप्रेमी (Cricket lover) असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कदाचित आश्चर्याचा धक्का देणारी असेल. मे महिन्यात आयपीएलचे (IPL 2023) सामने पार पडले. अंतिम सामना आयपीएलची फायनल चेन्नई आणि गुजरात यांच्यामध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. यंदाचा सामना चेन्नईने आपल्या खिशात घातला. परंतु या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) एका खेळाडूने गोलंदाजांना चांगले धुतले.
Havaman Andaj । विदर्भातील शेतकरी संकटात! ‘या’ पाच जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा
दिल्ली कॅपिटल्समधील स्टार खेळाडू सरफराज खानने (Sarfaraz Khan) जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील तरुणीसोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. सामना पाहायला आलेल्या रोमाना जहूर (Romana Jahur) या तरुणीच्या प्रेमात तो पडला होता. त्याने या तरुणीसोबत विवाह केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी कोणताही गाजावाजा न करता गुपचुप लग्न केले आहे.
Urfi Javed New Look । उर्फी जावेदचा नवीन लुक पाहून डोकं खाजवाल; यावेळी अभिनेत्रीने चक्क खिळ्यापासून…
त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये सरफराज, रोमाना आणि त्याच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत असल्याचा दिसत आहे. सरफराजने काळ्या रंगाची शेरवानी घातली आहे तर रोमानाने लाल आणि गोल्डन रंगाचा लेहेंगा घातला आहे. त्यांच्या या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
Mukesh Ambani । मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीने एका वर्षात २ लाख ६० हजार लोकांना दिला रोजगार
दरम्यान, मागील वर्षांपासून तो राष्ट्रीय संघात स्थान मिळावे यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु नुकत्याच पार पडलेल्या दुलीप ट्रॉफीत त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्याने या चार सामन्यात फक्त 54 धावा केल्या.
Poco M6 Pro 5G । दहा हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘पोको’चा हा नवीन फोन