मुंबई : एसटी महमंडळातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य महामंडळाने (Maharashtra State Corporation) 5,000 कंत्राटी चालकांच्या भरतीचा निर्णय रद्द केला आहे. काही दिवसांपूर्वी महामंडळाकडून 5 हजार चालकांची भरती करण्यात येणार असल्याची योजना प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र आता ही योजना रद्द केली आहे.खरतर एसटी संपाच्या काळात कर्मचारी संपावर असल्याने वाहतूक बंद पडू नये म्हणून काही कंत्राटी चालकांची (Contract basis Driver) भरती करण्यात आली होती.
काय सांगता? ‘या’ गावात चक्क माकडांच्या नावावर आहे 32 एकर जमीन
महत्वाची बाब म्हणजे संप काळात कंत्राटी चालकांच्या भरतीनंतरही महामंडळात एसटीला चालकांची (ST Drivers) कमतरता भासत होती. एसटी डेपोमध्ये गाड्या असूनही चालक नव्हते. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत होते. म्हणून 5 हजार एसटी चालकांच्या कंत्राटी भरतीची योजना आखण्यात आली होती. त्यासाठी निविदाही मागवण्यात आल्या होत्या. संप काळात भरण्यात आलेल्या काही चालकांची संख्या कमी करण्यात आली होती. तर काहींना मुदत वाढवूण देण्यात आली होती.
‘या’ जिल्ह्यातील दोन तरुणांनी यूट्यूबवरुन घेतले शेतीचे ज्ञान, वर्षातच घेतायत लाखोंचे उत्पादन
याआधी एसटी चालकांच्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या काही उमेदवारांचं प्रशिक्षणदेखील पूर्ण करण्यात आलं होतं. परंतु त्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या. म्हणून या उमेदवारांकडून वारंवार विचारणा देखील करण्यात येत होती. परंतु या संपूर्ण भरती प्रक्रियेला कोरोना महामारी आणि एसटी संपाचा फटका बसला होता. ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. दरम्यान आता एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखेर 5 हजार कंत्राटी चालकांच्या भरतीची योजना रद्द करण्यात आलीय.