
सततचा अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्ती (Unseasonal rains and natural calamities) यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावा लागते. यामुळे आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृतवाखाली शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
सर्वात मोठी बातमी! नरेंद्र मोदी आणि CM योगींना जिवे मारण्याची धमकी
या निर्णयामुळं सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. तसेच १० मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस सलग पाच दिवस पडला तरी देखील नैसर्गिक आपत्ती मानली जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीचा हा सर्वात मोठा निर्णय मानला जातोय. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
शिव ठाकरेच्या चाहत्यांसाठी समोर आली आनंदाची बातमी!
या निर्णयानुसार जर सलग पाच दिवस १० मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर ती नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी हा सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला निर्णय असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी देखील हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचं म्हटलं आहे.
मुकेश अंबानी आशियातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत प्रथम क्रमांकावर; तर गौतम अदानी थेट…