मुंबई : कर्जत-जामखेडचे (Karjat-Jamkhed)आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे नेहमी जनतेसाठी कुठल्याही परिस्थितीत मदतीला धावून जातात. रोहित पवार यांची एक संवेदनशील, तत्पर व कृतिशील ‘लोकप्रतिनिधी ‘ म्हणून राज्यात ओळख आहे. रोहित पवार निरनिराळ्या माध्यमातून आपत्तीच्या (disaster) निवारणासाठी काम करतात. सध्या शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांनी एक ट्विट केले आहे. सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे.
अमूल दूध दरात प्रतीलिटर ‘इतक्या’ रूपयांनी वाढ; दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना महागाईचा झटका!
राज्यात परतिच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीन ही पिके तर शेतात पाण्यामध्ये गेली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. याच पार्शवभूमीवर शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.
आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होणार ऊस परिषद, ऊस उत्पादकांचे राजू शेट्टींच्या घोषणेकडे लागले लक्ष
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, “हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजाचं दिवाळं निघालंय. त्याचे अश्रू पुसण्यासाठी आता राज्य सरकारने तातडीने पुढं यावं. #UP तही अशीच स्थिती असून त्याचं वर्णन खुद्द भाजप खासदार पैलवान बृजभूषणसिंह यांच्याच तोंडून ऐका”.
हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजाचं दिवाळं निघालंय. त्याचे अश्रू पुसण्यासाठी आता राज्य सरकारने तातडीने पुढं यावं. #UP तही अशीच स्थिती असून त्याचं वर्णन खुद्द भाजप खासदार पैलवान बृजभूषणसिंह यांच्याच तोंडून ऐका.@CMOMaharashtra pic.twitter.com/h43cnePzCw
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 15, 2022