Site icon e लोकहित | Marathi News

Eknath Shinde: राज्य सरकार नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करणार, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला महत्वपूर्ण निर्णय

The state government will rehabilitate villages affected by natural calamities, Chief Minister Shinde has taken an important decision

मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे (heavy rain) मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अतिवृष्टीने पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या बाधित गावांचे पुनर्वसन (Rehabilitation) करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास आज मंत्रिमंडळतील बैठकीत (meeting) मान्यता दिली आहे. महत्वाचं म्हणजे बाधित गाव, वाडी, तांड्यांचे नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना नागरी सुविधा देण्यात येणार आहे.

Vedanta Foxconn Project: ‘वेदान्त’च्या मालकांची राज्यासाठी मोठी घोषणा; ट्विटकरत म्हणाले…

शासनाचे पुरग्रस्तांचे पुनर्वसन बाबतचे सदरचे धोरण निश्चित होऊन जवळपास 15 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. दरम्यान शासनाने सध्याची आर्थिक, भौतिक व सामाजिक परिस्थिती आणि प्रचलित धोरणे विचारात घेऊन बाधित गावे , वाडी वस्त्यांचे तातडीने नवीन ठिकाणी स्थलांतरीत करुन पुनर्वसन करण्याकरीता सर्वसमावेशक असे धोरण निश्चित करण्याबाबतचा निर्णय घेतला.

Ajit Pawar: अजित पवारांना मुख्यमंत्री करा, ‘या’ खासदाराने केली मागणी

अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे किंवा दरडी कोसळणे या
प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आलेल्या गावांचे नवीन ठिकाणी स्थलांतरीत करुन पुनर्वसन करण्याकरीता त्या ग्रामीण भागातील पात्र लाभधारकांच्या पुनर्वसनाकरीताचे निकष, पुनर्वसित गावठाणामध्ये उपलब्ध करुन द्यावयाच्या नागरी सुविधा व त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे करावी यासंदर्भात देखिल निर्णय घेण्यात आला.

Supriya Sule: मुख्यमंत्र्यांनी घरगुती दौरे बंद करून राज्याच्या विकासाचं पहावं – सुप्रिया सुळे

Spread the love
Exit mobile version