राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून धार्मिक तणाव वाढला आहे. शेवगाव, कोल्हापूर, अहमदनगर, आष्टी, पारनेर आदी शहरांमध्ये धार्मिक तणाव पाहायला मिळाला. यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आक्रमक झाले आहेत. शहरांसोबत खेड्यापाड्यात दंगली भडकवण्याचे राज्य सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Sharad Pawar। शरद पवार धमकी प्रकरणात पुन्हा एक नवीन खुलासा; समोर आली धक्कादायक माहिती
अंबादास दानवे म्हणाले, शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Govt.) हे हिंदुत्ववादी नाही. हे सरकार हिंदू विरोधी आहे. आळंदीमध्ये (Alandi) घडलेल्या कालच्या घटनेवरून हे ठरवता येईल. राज्यामध्ये मार्च महिन्यापासून जातींमध्ये आणि हिंदू मुस्लिम तेढ निर्माण केले जात आहेत. त्याचे राजकारण केले जात आहे. कर्नाटकात घडलेल्या घटना प्रमाणेच महाराष्ट्रात राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
धक्कादायक! कुत्रं शेतात का सोडलं म्हणून दिराने भावजयीला लाथाबुक्क्यानं मारल अन्…
भाजपाच्या (BJP) ट्विटर हँडल वरून औरंगजेबाचे नाव घेऊन राज्यातील वेगवेगळ्या नेत्यांचे फोटो टाकले गेले. कधी औरंगजेबाचे नाव घ्यायचे तर कधी पाकिस्तानचे नाव घ्यायचे. स्वतःची पोळी भाजण्याचे काम करून घ्यायचे, असा आरोप त्यांनी भाजपावर केला.
ओडिशा अपघातात 3 ट्रेनचा चक्काचूर, तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांच झालं नुकसान
औरंगजेबाचा पोस्टर पहिल्यांदा संभाजीनगरमध्ये फडकवण्यात आले. त्यानंतर हे पोस्टर अहमदनगर संगमनेर आणि कोल्हापूरमध्ये फडकवले गेले. अशाप्रकारे हे पोस्टर प्रत्यक्षातपणे फडकवण्यात आले. त्यानंतर सर्रासपणे औरंगजेबाचे स्टेटस ठेवले जाऊ लागले. पहिल्यांदा ज्याने औरंगजेबाचा फोटो बाहेर काढला. या सरकारने त्याच्यावर कठोर कारवाई केली असती तर, या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाची पोस्टर फडकवण्याची हिंमत कोणाची झाली नसती, असे अंबादास दानवे म्हणाले.
लग्नाला काही तासच उरले होते मात्र नवरदेवासोबत घडलं भयानक; घटना वाचून बसेल धक्का