
Milk Price | अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. परंतु मागील काही दिवसांपासून गायीच्या दुधाचे दर (Cow Milk Price) कमालीचे घसरले आहेत. अगोदरच शेतकऱ्यांवर पाण्याचे संकट त्यात घसरलेले दुधाचे दर त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. गायीच्या दुधाचे दर (Milk Rate) वाढावेत यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. (Latest Marathi News)
Bus Accident । धक्कादायक! बस तलावात पडून 17 जणांचा मृत्यू, तर 35 जखमी
त्यानंतर राज्यात सरकारने गायीच्या दुधासाठी 3.5/8.5 गुणप्रतिस 34 रुपये दर देणे बंधनकारक असल्याचा अध्यादेश जारी केला. असे असले तरी खासगी दूध खरेदी संघ कमी प्रतीच्या दुधाला एक रुपयाने दर रिव्हर्स करू लागले आहेत. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. खासगी दूध संघानी SNF कमी बसली तर प्रति पॉइंटला एक रुपया तर फॅट कमी बसली तर प्रत्येक पॉइंटला 50 पैसे कमी केले आहेत. त्यामुळे अगोदर 32 रुपये दर असताना जितके पैसे मिळायचे त्यापेक्षा कमी म्हणजे 27 ते 28 रुपये आता मिळत आहेत.
Indonesia News । मोठी बातमी! २१० किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात जिम ट्रेनरचा गेला जीव
मागील काही दिवसांपासून दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सर्व शेतकरी संघटना आणि दूध संघाचे मालक यांची संयुक्त बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी या समस्येवर उपाय काढला होता. सर्व शेतकरी पूर्वीपेक्षा जास्त दर मिळणार म्हणून आनंदी होते. परंतु, दरवाढ करूनही जुन्याच दराने दूध खरेदी केले जात असल्याने शेतकरी पुन्हा एकदा संतप्त झाले आहेत.
Mahindra Thar । भन्नाट ऑफर! अवघ्या 25000 रुपयांत खरेदी करा महिंद्रा थार
यावरून स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “जरी गायीच्या दुधाला 34 रुपये दर देण्याचा अध्यादेश राज्य शासनाने काढला असला तरी हा अध्यादेश म्हणजे दूध उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली आहे.
Khalapur Landslide । 72 तासांपासून शोधमोहीम सुरु! 27 जणांचा मृत्यू, तरीही 78 लोक गायबच