मागच्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागात पावसाने थैमान घातले आहे. महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिठांचा पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, गहू, द्राक्षे, केळी, याचबरोबर शेतकऱ्यांच्या अजून बऱ्याच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) हवालदिल झाला आहे.
‘त्या’ व्हिडीओवरून सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना थेट सवाल; म्हणाल्या…
दरम्यान हवामान विभागाने (Department of Meteorology) राज्यात पुन्हा पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
एक दिव्यांग चाहता भर उन्हात फक्त परश्यासोबत फोटो काढण्यासाठी थांबला अन्…
शेतकरी चिंतेत –
एकीकडे पिकाला पाहिजे तो भाव मिळत नाही आणि दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी असं आव्हान देखील कृषी विभागानं केलं आहे.
महिलेने ओव्हरटेक केल्याने व्यक्तीने तिला भरचौकात केली मारहाण; पाहा VIDEO