मुंबई : आपण बऱ्याचदा पाहतो की समाजातील बरीच मुलं आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून (Education) दूर राहतात. पण यामध्ये काही जिद्दीने आणि चिकाटीने शिकणारे देखील असतात. आता असाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती फुटपाथवर रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करताना दिसत आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ई-पीक पाहणीची अट झाली रद्द, आता थेट मिळणार शेतकऱ्यांना मदत
हा व्हिडीओ इंस्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter) यांसारख्या प्लॅटफॉर्मवर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ (Video) पाहून शिक्षणासाठी धडपड करणाऱ्या चिमुकलीसाठी नेटकरी भावनिक झाले असून तिच्या या कष्टाला त्यांनी दादही दिली आहे.
‘या’ कारणामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी मालकाचाच घेतला जीव
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या बाजूला कुडाच्या घरांची वस्ती दिसत आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत ७० हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत तर ५ हजारांहून जास्त लोकांनी तो लाईक केला आहे. यावर नेटकरी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “अशीच मेहनती मुलं पुढे जाऊन आपलं आणि देशाचं नाव उज्ज्वल करतात”.
Sugar Cane: शॉर्टसर्किटमुळे इंदापूर तालुक्यातील तीन एकर उस जळून खाक