मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे दुग्ध वसाहतीतील वृक्ष तोडण्याविरोधात महत्वाचे निर्देश दिले आहेत. मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील आरे कारशेडच्या कामासाठी पुढील सुनावणीपर्यंत आरेतील एकही तोडू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पर्यावरणप्रेमींच्या याचिकेवर शेवटी न्यायालयाने सुनावणी केली. पुढील सुनावणी १० ऑगस्टला करण्यात येईल देखील माहिती देण्यात आली आहे.
झाडाची फांदी कापण्याच्या नावाखाली पूर्ण झाड कापले जात होते असा आरोप पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केला होता. नंतर कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर शुक्रवारी न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत एकही झाड तोडू नये असा आदेश दिला.
आरे या ठिकाणचे प्रस्तावित कारशेडच्या जागेतील एकही झाड तोडण्यात आले नसून आम्ही फक्त झुडपे तोडल्याची माहिती यावेळी एमएमआरसीकडून न्यायालयात देण्यात आली. आता पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे.