आपण पाहतो की आपल्या आजूबाजूला अनेक धक्कादायक घटना (Shocking incident) घडत असतात. ज्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना असतात. दरम्यान अशीच एक घटना घडली आहे ती सुद्धा शाळेत. ही धक्कादायक घटना शाळेत (school) घडल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीच वातावरण पसरले आहे. झारखंडमध्ये (Jharkhand) एका शाळेत गुरूच्या आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडल्याच उघडकीस आलं आहे.
Nagaraj Manjule: या दिवशी येणार नाळ चित्रपटाचा दुसरा भाग,नागराज मंजुळेंनी शेअर केली पोस्ट
नेमकी घटना काय घडली?
झारखंडमधील पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील बराजमदा ओपी परिसरात एक खासजमदा सरकारी अपग्रेडेड मिडल स्कूल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या शाळेतील शिक्षक (Teacher) प्रेम कुमार कथितरित्या दररोज शालेय मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत असे. एक दोन महिने नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक प्रेम कुमार हे शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींना जबरदस्तीनं आपल्या मांडीवर बसवून मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवत होता.
Rashmika-Vijay: विजय देवरकोंडाला डेट करत असल्याच्या चर्चांवर रश्मीकाने सोडलं मौन; म्हणाली…
दरम्यान अल्पवयीन मुलींनी या शिक्षकाची तक्रार पालकांकडे केल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांचा आणि स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला. दरम्यान विद्यार्थिनींच्या पालकांनी त्या शिक्षकाच्या तोंडाला काळं फासलं. एवढंच नाही तर, त्या शिक्षकाला चप्पलचा हार घातला आणि संपूर्ण गावात धिंड काढली.
Amol Kolhe: ‘या’ कारणामुळे अमोल कोल्हेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट, चर्चांना उधाण