Site icon e लोकहित | Marathi News

Pune Crime । धक्कादायक! झोपमोड केल्याने भाडेकरुने केली घरमालकाची हत्या

Pune Crime

Pune Crime । पुणे : सध्या गुन्हेगारीमध्ये (Crime) वाढ झाली आहे. अनेक उपाययोजना करूनही गुन्हेगारीला आळा बसला नाही. क्षुल्लक कारणावरून वाद झाल्याचे आपण पाहत असतो. धक्कादायक बाब म्हणजे लहान मुलेही गुन्हेगारीकडे वळत आहेत. अशातच आता एक धक्कादायक घटना घडली आहे. झोपमोड केल्याने भाडेकरुने घरमालकाची हत्या करण्यात आली आहे. (Pune Crime News)

Havaman Andaj । सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

मिळालेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरातील संतोष राजेंद्र धोत्रे भाड्याने राहत होता. तो सोमवारी दुपारी दारू पिऊन झोपला होता. त्यावेळी त्याची घरासमोर दुचाकीचे जोरात हॉर्न वाजवून झोपमोड झाली. झोपमोड झाल्याने धोत्रे याने घरमालक दादा ज्ञानदेव घुले यांना मारहाण करायला सुरुवात केली.

Rahul Gandhi । राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, पीएम मोदींबाबत केले ‘ते’ वक्तव्य भोवणार? भाजपची निवडणूक आयोगात धाव

धोत्रेने पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत बुडवले आणि हत्या केली. दरम्यान, घुले रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची पोलिसांत तक्रार दिली. चौकशीदरम्यान घुले आणि धोत्रे यांच्यात भांडण झाल्याची माहिती मिळाली. तपासात पोलिसांना घुले यांचा मृतदेह आढळला. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

Virat Kohli Retirement । विराट कोहलीच्या निवृत्तीबाबत भविष्यवाणी! व्हायरल पोस्टवरून चर्चा

Spread the love
Exit mobile version