सोलापूर: मुंबई येथील दोन जुळ्या आयटी इंजिनियर मुलींनी एकाच मांडवामध्ये एका तरुणासोबत अनोखा विवाह केल्याची घटना माळशिरस (Malshiras) तालुक्यातील अकलूज या ठिकाणी घडली आहे. आता या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा देखील चालू आहे. मात्र आता या दोन तरुणींशी लग्न करणाऱ्या मुलांबाबत एक धक्कदायक माहिती समोर आली आहे.
कांद्याला भाव नसल्याने संतापून शेतकऱ्याने कांद्यावरच काढले नरेंद्र मोदींच चित्र
पोलिस चौकशीमध्ये या तरुणाचा खरे रूप समोर आले आहे. दोन मुलींसोबत एकाचवेळी लग्न करणाऱ्या अतुलचे आधीच एक लग्न झाले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुलीकडच्यांनाही धक्का बसला आहे. अतुलचे याआधी देखील लग्न झालेले आहे. त्याच्या पहिल्या पत्नीने आता त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या महंतांच शरद पवारांना आव्हान; म्हणाले, “दत्त उपासना करा”
दरम्यान, पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी लहानपणापासून दिसायला एकसारख्या आहेत. त्या जेवण देखील एकाच ताटात करतात. त्यांना कायम एकत्र राहायचे होते त्यामुळे त्यांनी एकाच तरुणाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. पिंकी आणि रिंकी यांना एकत्र राहण्यासाठी एकच नवरा हवा होता. अखेर कुटुंबीयांनी त्यांच्या या विवाहसोहळ्याला मान्यता दिली आणि २ डिसेंबरला हा विवाहसोहळा पार पडला.
मत मागायला आल्यास अपमान करण्यात येईल; बारामतीमध्ये अनोख्या फ्लेक्सची जोरदार चर्चा