मुंबई : सध्या संपूर्ण राज्यभारत (Maharashtra) शहरात मुलांना पळवून नेणाऱ्या टोळ्या (Kidnapping gangs) सक्रिय झाल्या आहेत. दरम्यान या टोळ्या शाळेतून मुलांना चोरून नेत असल्याच्या अफवा पसरत आहेत. या अफवांमुळे संपूर्ण राज्यात दहशतीचे वातावरण (atmosphere of terror) निर्माण झाले आहे. परंतु पोलिसांनी (police) अशा घटना घडल्या नसून या सगळ्या अफवा आहेत अस सांगत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सकाळी पोट नीट साफ होत नाही? मग ‘हा’ करा उपाय, मिळेल मिनिटात आराम
सध्या सोशल मीडियावर तसेच अनेकांच्या मोबाईलवर लहान मुलांना पळवून नेण्याची अफवा पसरविणारे संदेश, छायाचित्र आणि चित्रफीत व्हायरल झाले आहेत. दरम्यान चित्रफितीत काही जण एकाला मारहाण करीत आहेत. तसेच या चित्रफितीत लहान मुलांना पळवून नेतानाचे देखील आढळून आल्याचे दाखविण्यात येत आहे. दरम्यान या टोळीतील अन्य सदस्य शहरात फिरत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. परंतु दुर्दैवाने या अफवेतून चार साधूंना तर अन्य एका घटनेत तृतीय पंथियाला मारहाण झाली.
Eknath Shinde: पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणेवर एकनाथ शिंदेनी दिली प्रतिक्रिया म्हणाले…
दरम्यान, आता मुले पळविणाऱ्या टोळीबाबत सामाज माध्यमावर अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच पोलिसांनी कुणीही अफवा पसरविणारे संदेश एकमेकांना पाठवू नये, असे आवाहन केले आहे. तसेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी,”शहरात कोणतीही टोळी नाही. मुले चोरून नेतात, ही अफवा असून. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच मुले चोरी करणाऱ्या टोळीबाबत संदेश आल्यास तत्काळ डिलिट करा. इतरांना पाठवू नका, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल” असे आवाहन केले आहे.