Site icon e लोकहित | Marathi News

Maharashtra Politics । ठाकरे गटाला मोठं खिंडार! एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics

Maharashtra Politics । मुंबई : महाविकास आघाडीसह महायुतीही लोकसभेच्या (Loksabha election) निवडणुकीसाठी तयारी करताना दिसत आहेत. राजकीय नेतेमंडळी आपल्या मतदारसंघात सभा घेत आहेत. यंदाची निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची असणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते पक्षांतर करत आहेत. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)

Yogi Adityanath । खळबळजनक! योगी आदित्यनाथ यांना दिली बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस कंट्रोल रूममध्ये आला फोन आणि…

उद्धव ठाकरे आज मावळ दौऱ्यावर आहेत. पण दौऱ्यापूर्वी त्यांना मोठा धक्का बसला आहे. मावळमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे नवघरचे पंचायत समिती सदस्य दीपक ठाकूर, उलवे नोडचे शहरप्रमुख प्रथम पाटील, शाखाप्रमुख विजय भिसे, उरण पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील आणि युवासेनेचे नेते क्षितीज शिंगरे यांनी ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Crime News । धक्कादायक! सलमान खानवर चाकूने हल्ला, पोलिसांकडून चौघांना अटक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला असून यामुळे उद्धव ठाकरे यांना खूप मोठा धक्का बसला आहे. याचा परिणाम उद्धव ठाकरे यांना आगामी निवडणुकीत सहन करावा लागेल. तसेच या मतदारसंघातून नुकतेच राष्ट्रवादीमधून ठाकरे गटात आलेले माजी महापौर संजोग वाघेरे यांना उद्धव ठाकरे हे लोकसभेसाठी या मतदारसंघातून संधी देऊ शकतात.

Car Accident । शिवसेनेच्या आमदाराच्या गाडीची दुचाकीला धडक; उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू, ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

Spread the love
Exit mobile version