
मागील काही महिन्यांपासून शिवसेना कोणाची ? धनुष्यबाण कोणाचा ? यावरून शिंदे व ठाकरे गटात वाद सुरू होते. दरम्यान निवडणूक आयोगाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून शिवसेना ( Shivsena) पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. आता ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे.
याबाबत संजय राऊत म्हणाले की, “निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार आहोत असं संजय राऊतांनी म्हंटल आहे.
कोंबड्यांने घेतला मालकाच जीव; तडफडत तडफडत मालकने सोडले प्राण
त्याचबरोबर राऊत पुढे म्हणाले, “निवडणूक ‘सत्यमेव जयते’ ऐवजी आता ‘असत्यमेव जयते’ असे करावे लागणार आहे. खोक्यांचा वापर कुठंपर्यंत झालाय हे या प्रकरणातून दिसून येत आहे. पाण्यासारखा पैसा वाहिला आणि हा पैसा कुठं गेला हे लोकांनी पाहिला आहे. शिवसेना प्रमुख व शिवसैनिकांच्या त्यागातून शिवसेना पक्ष उभा झाला होता. तो पक्ष 40 बाजारबुणगे पक्ष विकत घेतात याची नोंद होणार आहे”.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर संजय राऊत संतापले; म्हणाले,”हे कोणाचेतरी गुलाम…”