केजीएफ हा बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे. ‘केजीएफ’ फेम अभिनेता यश हा या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. जगभरात केजीएफ मधील रॉकी भाईचे (Rocky Bhai) करोडो चाहते आहेत. काल ( दि.9) त्याचा वाढदिवस झाला. यशाच्या वाढदिवसानिमित्त केजीएफच्या ( KGF) निर्मात्यांनी एक महत्त्वाची व मोठी घोषणा केली आहे.
IND vs SL: क्रिकेट प्रेमींसाठी मोठी बातमी, भारताचे ‘हे’ 3 मोठे खेळाडू एकत्र खेळणार
केजीएफ पाठोपाठ प्रदर्शित झालेला केजीएफ 2 देखील प्रचंड गाजला. आता लोकांमध्ये केजीएफ 3 ( KGF 3) ची उत्सुकता आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता, तर दुसरा भाग मागच्यावर्षी प्रसिध्द झाला. यामध्ये रविना टंडन, संजय दत्त यांच्यासारख्या बॉलिवूड कलाकारांनी देखील काम केले होते.
रोहित पवारांची क्रिकेट असोसिएशनमध्ये धमाकेदार एन्ट्री; अध्यक्षपदी बिनविरोध निवड
अभिनेता यशच्या वाढदिवसानिमित्त केजीएफच्या निर्मात्यांनी केजीएफच्या तिसऱ्या भागाची हिंट दिली आहे. याबाबतची माहिती चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या होम्बाळे प्रोडक्शन ने ट्विट करत दिली आहे. या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू असून 2025 मध्ये याचे चित्रीकरण सुरू करण्यात येणार आहे.
‘या’ व्यक्तीने विकत घेतला तब्बल २० कोटींचा कुत्रा; वाचा सविस्तर