Maratha Reservation । मुंबई : मराठा आरक्षणावरून अजूनही राज्याच्या वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे अजूनही आपल्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यासंदर्भात नुकतीच मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात एक बैठक पार पडली. (Latest Marathi News)
Kishori Pednekar । मोठी बातमी! किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, दाखल झाला गुन्हा
सुमारे अडीच तास सुरु असणाऱ्या बैठकीत सात मुद्द्यांवर एकमत झाले असून हे मुद्दे जरांगे पाटील यांच्यासमोर मांडले जातील. परंतु या सातपैकी तिसरा मुद्दा हा सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा विषय मागासवर्गीय आयोगाकडे पाठवला जाणार आहे. त्यामुळे ओबीसी (OBC) समाज आक्रमक होऊ शकतो.
MLA Disqualified | मोठी बातमी! शिवसेना आमदार अपात्र प्रकरणासंदर्भात समोर आली मोठी अपडेट
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे. आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारकडे जाऊन यावर निर्णय घेण्यात यावा, असे मत ओबीसी नेत्यांनी व्यक्त केले आहे. परंतु सरकारने वेगळाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या मुद्द्यावरून राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघू शकते.