राज्यात गावोगावी यात्रा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सगळीकडेच बैलगाडा शर्यतींचा ( Bullock Cart) थरार सुरू आहे. दरम्यान सांगलीच्या भाळवणी येथे नुकतीच बैलगाडा शर्यत पार पडली. या शर्यतीत पुण्याच्या बकासुर व कराडच्या महिब्या बैलजोडीने पहिला नंबर पटकावला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या शर्यतीत बक्षीस म्हणून गाडीच्या मालकाला थार गाडी मिळाली आहे.
जीवाला धोका असल्याच्या तक्रारीवर अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने ही शर्यत भरविण्यात आली होती. ‘रुस्तूम-ए-हिंद’ या नावाने ही बैलगाडा शर्यत प्रसिद्ध आहे. या बैलगाडा शर्यतीत राज्याबाहेरील सुमारे २०० बैलगाडी स्पर्धेक सहभागी झाले होते. स्पर्धेतील अंतिम सामन्यात पुण्यामधील मुळीशीच्या मोहिल शेठ धुमाळ यांच्या बकासूर आणि कराडच्या सदाशिव कदम यांच्या महीब्या या बैलजोडीने विजयाचा गुलाल उधळला.
‘तो’ रॅपर गायब झाल्याने कुटुंबीय आहेत काळजीत; जितेंद्र आव्हाडांकडून घेतली अशी मदत
हा बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी महाराष्ट्रातील दोन लाखांहून अधिक बैलगाडा शर्यत प्रेमी हजर होते. शर्यतीमधील बक्षिसामुळे लोकांना ‘थार’ गाडी कोण जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. ( Thar ) शर्यतीसाठी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार निलेश लंके, माजी आमदार पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी हजेरी लावली होती.
अजित पवार घेणार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय वर्तुळात पुन्हा रंगल्या चर्चा