रितेश व जेनेलिया ही जोडी चांगलीच प्रसिध्द आहे. हे दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. रितेश व जेनेलिया एक आदर्श जोडपे म्हणून ओळखले जाते. या दोघांच्या अनेक मुलाखती देखील विशेष प्रसिद्ध आहेत. परंतु, सध्या चर्चा सुरू आहे ती या जोडीच्या आगामी चित्रपटाची ! ‘वेड’ या चित्रपटातून रितेश व जेनेलिया ( Ritesh & Genelia) पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर देखील नुकताच रिलीज झाला आहे.
शेतकऱ्याने धरले अधिकाऱ्याचे पाय; म्हणाला अडचण दूर करा अन्यथा…
रितेश व जेनेलिया हे दोघेही या आधी ‘लयभारी’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यानंतर ‘वेड’ ( Ved Movie trailer) मध्ये हे दोघे एकत्र दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली होती. या चित्रपटात हे दोघेही मुख्य भूमिकेत दिसणार असून नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलर मध्ये अगदी सुरुवातीलाच रितेश प्रेमावर बोलताना पहायला मिळत आहे.
बैलगाडा शर्यतींचा डाव पुन्हा रंगणार; सुप्रीम कोर्टाची सुनावणी
यानंतर रितेश देशमुख ( Ritesh Deshmukh) चेहऱ्यावर रागाचे व व्याकुळ भाव घेऊन भर पावसात फायटिंग करत आहे. यावेळी तिथे जेनेलीयाची एंट्री होते. यामध्ये सिगारेटचे झुरके घेत भर पावसात जेनेलियासमोरून जाणारा रितेश दाखवण्यात आला आहे. ‘प्रेम असतं प्रेमासारखंच, काही वेड्यासारखं प्रेम करतात तर काही प्रेमातलं वेड होतात’ हा या टिझर मधील जबरदस्त डायलॉग आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देखमुख याने केले असून निर्मिती जेनेलिया देखमुख हिने केली आहे.
“माझी बायको होशील का?” इन्स्टाग्रामवर स्टोरी ठेवणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल; वाचा सविस्तर