
सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये फार्मसी कर्मचारी बिलिंग काउंटरवर बसलेला दिसत आहे. त्याच्या आश्चर्यकारक टायपिंग गतीने सर्वजण थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवरून शेअर करण्यात आला असून १ मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे.
हार्दिकने सिनिअर खेळाडूंना घातल्या शिव्या? पाहा Video
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कर्मचारी विजेच्या गतीने टायपिंग करत आहे. तो एकामागून एक औषधे घेतोय आणि त्याच्या कॉम्प्युटरवर वेगाने तपशील लिहितोय. टाईप करण्यासाठी त्याला कीबोर्ड पाहण्याचीही गरज नाही, तो कीबोर्ड न पाहता देखील टायपिंग करतोय त्यामुळे त्याचे कौतुक देखील केले जात आहे.
स्फोटामुळे डेअरीफार्मला लागली भीषण आग; १८ हजार गायींचा दुर्दैवी मृत्यु
या व्यक्तीचे टायपिंग कौशल्य पाहून लोक खूप प्रभावित होत आहेत. या व्हिडिओवर अनेकजण वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘किती अद्भुत प्रतिभा आहे’. तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘ इतक्या वेगाने टाईप करणे प्रत्येकाच्या क्षमतेत नसत अशा अनेक वेगेवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी या व्हिडिओवर करत आहेत.
“तरुण हेअर कट करायला गेला अन् आगीने त्याला…”, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
This receptionist at a busy pharmacy in India. pic.twitter.com/lYk80QQGav
— CCTV IDIOTS (@cctvidiots) April 13, 2023