Site icon e लोकहित | Marathi News

“बिनकामाचे लोकं मोर्चा काढतात”; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना खोचक टोला

"The Unemployed March"; Eknath Shinde's taunt to the opponents

मुंबई : भाजपच्या अनेक नेत्यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. त्यामुळे मागच्या काही दिवसापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडी सीमा समस्या, बेरोजगारी इत्यादी प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारण्यासाठी उद्या १७ डिसेंबरला महामोर्चा काढणार आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना खोचक टोला देखील लगावला आहे.

ठाकरे गटाला धक्का! उरलेले आमदारही सोडणार साथ?

“आरोप प्रत्यारोप करण्याची स्पर्धा लागली आहे. त्याला आम्ही आमच्या कामामधून उत्तर देऊ. मात्र, ज्यांना खोके माहिती आहेत, तेच खोक्याची भाषा करतात. आम्ही घरी खोके ठेवणारे नाहीत. तर आम्ही देणारे आहोत,”असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे पुढेच म्हणाले “आपण काम करणारे आहोत, काम करणाऱ्यांचीच चर्चा होते आणि बिनकामाचे मोर्चा काढतात,” असं म्हणत विरोधकांना टोला लागलावला आहे.

बिग ब्रेकिंग! मुंबई उच्च न्यायालयाचा शिंदे गटाला दणका

दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी देखील दिली आहे. “ मोर्चा शांतपणे व्हावा, त्याला परवानगी दिली आहे. लोकशाहीची पद्धत वापरून जर कोणाला विरोध करायचा असलेत तर ते विरोध करतील. आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहीले पाहीजे याकडे लक्ष देऊ.” असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

“मला हिंदूंचीच भिती वाटते” – शरद पोंक्षे

Spread the love
Exit mobile version