
लावणी कलाकार गौतमी पाटील(Gautami Patil) मागील काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत आहे. अगामी ‘घुंगरू’ चित्रपटातून ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान गौतमी इतकी प्रसिद्ध झाली आहे की, एका हॉटेलमध्ये चक्क तिच्या नावाने थाळी सुरू करण्यात आली आहे.
ब्रेकिंग! जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका?; गृहमंत्रालयाकडून वाढविण्यात आली सुरक्षा
सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी (Tembhurni) गावातील एका हॉटेलमध्ये ही थाळी सुरू करण्यात आली आहे. गौतमी पाटीलच्या प्रसिद्धीचा फायदा घेत येथील हॉटेल मालकांनी गौतमी थाळी सुरू केली आहे. विशेष म्हणजे या हॉटेलचे मालक महेश गोरे यांनी गौतमी पाटीलच्या हस्ते आपल्या नवीन हॉटेलचे उद्घाटन केले.
बीसीसीआयला नवीन धक्का; भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीत अचानक झाला ‘हा’ बदल!
या हॉटेलचे नाव सुमन (Hotel Suman)असे असून शुद्ध शाकाहारी जेवण या ठिकाणी भेटते. गौतमी पाटील यांच्या नावाने शुद्ध शाकाहारी थाळी सुरु करत महेश गोरे यांनी मार्केटिंगचा नवीन फंडा शोधून काढला आहे. तिची तरुणाई मध्ये असणारी वाढती क्रेझ व प्रसिद्धी लक्षात घेता या थाळीमुळे हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
गौतमी नामक या थाळीमध्ये भेंडी फ्राय, मिक्स व्हेज, सलाड, स्पेशल डाळ फ्राय, चार बटर रोटी, गुलाबजाम असे पदार्थ आहेत. या थाळीची किंमत 240 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
“… तर अजित पवारांना पाकिस्तानमध्ये रवाना करा”; भाजप नेत्यांची मागणी