बीड : आजकाल खरेदी किंवा विक्री करताना फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. बीडमध्ये (Beed) एका शेतकऱ्याची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोकड आणि पाठ विकत घेताना खोट्या नोटा (Fake Notes) देऊन काही तोतया व्यापाऱ्यांनी या शेतकऱ्याला चांगलेच गंडवले आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलीस तपास करत आहेत.
बीड जिल्ह्यातील आष्टी मधील कडा गावात राहणारे नामदेव भाऊ घोडके हे शेळीपालन करतात. त्यांच्याकडे एकूण सहा शेळ्या आहेत. मंगळवारी काही व्यापारी नामदेव यांच्या घराजवळ आले. या व्यापाऱ्यांनी बोकड आणि पाठ विकत घेण्याची इच्छा नामदेव यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे विक्रीसाठी असलेले बोकड आणि पाठ व्यापाऱ्यांना दाखवली. (Fake people chetated on farmer)
Manipur Violence Update । दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश!
बोकड आणि पाठ पाहून व्यापाऱ्यांनी लागलीच पसंती दर्शवली आणि साडे नऊ हजार देणार असे सांगून टाकले. समोरचे व्यापारी अपेक्षेपेक्षा जास्त भाव देत असल्याने नामदेव यांनी बाकी कुठली चौकशी न करता बोकड आणि पाठ व्यापाऱ्यांच्या हवाली केली. दरम्यान व्यापारी निघून जाताच नामदेव यांनी पैसे पाहिले तर त्या नोटा बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
Holiday Package | हॉलिडे पॅकेजचे आमिष दाखवून फसवणूक! पुणेकरांचे कोट्यवधींचे नुकसान…
यामध्ये दोन हजारांच्या चार नोटा आणि पाचशेच्या तीन नोटा बनावट होत्या. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तोतया व्यापाऱ्यांनी बोकड आणि पाठीसह कधीच पळ काढला होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर नामदेव घोडके व त्यांच्या पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली.
Sara Ali Khan । सारा अली खानचा स्विमिंग पुलमधील ‘तो’ फोटो व्हायरल; फोटोमधील मुलगा नक्की आहे तरी कोण?