मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ अपघात होऊन त्यांचं निधन झाले आहे. यांचे निधन होताच शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, विनायक मेटे मराठा आरक्षणावर कायम आवाज उठवायचे. त्यांनी मराठा समाजासाठी अनेक कामे केली आहेत. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्मण झाली आहे. राज्यभर यांच्या निधनाची हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आमदार दीपक केसरकर यांनीही विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहिली. विनायक मेटे यांच्या मृत्यूची बातमी दुःखदअसल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. विनायक मेटे यांनी कायम मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आवाज उठवला. विनायक मेटे यांच्या निधनाने महाराष्ट्र एका उमद्या नेत्याला मुकला असं दीपक केसकर म्हणाले.
नेमका कसा झाला अपघात?
विनायक मेटेंचा सहकारी एकनाथ कदम (Eknath Kadam) यांनी माध्यमांशी बोलताना अपघात कसा झाला याची माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही बीडवरून मुंबईला येत होतो. आम्हाला एका मोठ्या ट्रकनं कट मारला. त्यामुळे ट्रकच्या बंपरमध्ये कार अडकली आणि काही अंतरापर्यंत फरफटत गेली. पण मदत पोहोचण्यासाठी एक तास लागला. मी फोन केला तेव्हा कंट्रोल रूमवरच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर प्रतिसाद दिला नाही. जवळपास ६ वाजता रुग्णवाहिका आली”