Site icon e लोकहित | Marathi News

Rutuja Latke: अंधेरी पोटनिवडणुकीतून ऋतुजा लटकेंचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा, कारण…

The way is clear for Rituja Latke to be elected unopposed from Andheri by-election, because…

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून (Andheri East Assembly By-Election) एक महत्वाची बाब समोर आली आहे. या पोटनिवडणुकीतून भाजपाने (Bjp) माघार घेतली आहे. यामध्ये भाजपाच्या मुरजी पटेल(Murji Patel) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. हा अर्ज माघार घेतल्यामुळे आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही बाब ठाकरे गटासाठी दिलासादायक ठरली आहे.

हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेल्यामुळे 24 तासात 2 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

या पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरु होता. दरम्यान यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामुळे वळण मिळालं. या पत्रामुळे अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. दरम्यान नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत संपूर्ण माहिती दिली.

Virat Kohli: विराट कोहली सोबत ती सुंदर मुलगी कोण? चाहत्यांना पडला प्रश्न; चर्चाना उधाण

यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, “५१ टक्के आम्ही ती लढाई जिंकलोच असतो कारण आमची पूर्ण तयारी झाली होती. इतकचं नाही तर आम्ही रणांगणात असून, तिकड वॉर्डात जुळवाजुळव झाली होती. महत्वाची बाब म्हणजे आम्ही १०० टक्के निवडणूक आशिष शेलार यांच्या नेतृत्वात जिंकणार होतो. यापूर्वीच भाजपाने असा निर्णय घेतला आहे. असा निर्णय याआधीही अनेकदा घेण्यात आला होता. दरम्यान ही संस्कृती आजची नसून अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून अनेक उदाहरणं आहेत,” असं चंद्रशेखखर बावनकुळे यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! आता ई-पीक पाहणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत वाढली मुदत

पुढे बावनकुळे यांना मुरजी पटेल अपक्ष लढतील का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की “मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत. कारण एकदा भाजपाचा उमेदवार होतो तो पक्षाच्या निर्णयाविरोधात जात नाही. त्यामुळे ते भाजपाचे आणि युतीचे उमेदवार होते. त्यांच्यासंबंधी ही शंका घेण्याची गरज नाही” अस देखील बावनकुळे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय! अखेर 5 हजार कंत्राटी एसटी चालकांच्या भरतीची योजना रद्द

राज ठाकरेंची पत्राद्वारे भाजपाला विनंती

काल रविवारी भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शेलार यांनी राज ठाकरे यांना
भाजपा उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. दरम्यान यावेळी राज ठाकरे यांनी भाजपाची विनंती अमान्य केली. इतकंच नाही तर याउलट तुम्हीच या निवडणुकीतून माघार घेत लटके यांना पाठिंबा देण्याची विनंती केली. तसेच राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक लढवू नका, असं आवाहन केलं होतं.

Spread the love
Exit mobile version