घरगुती वापरात कांद्याला विशेष महत्व आहे. मात्र हाच कांदा सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातुन पाणी काढत आहे. दिवसेंदिवस कांद्याचे दर (Onion rates) घसरताना दिसत आहेत. कांद्याची देशांतर्गत मागणी सध्या कमी आहे. त्यात निर्यातीला सुद्धा ग्रहण लागले आहे. यामुळे कांद्याचे दर घसरले असून शेतकऱ्यांच्या शेतात कांदा पडून आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतातुर झालेले आहेत.
आईच्या मृत्यूनंतर नरेंद्र मोदींना आणखी एक मोठा धक्का; कुटुंबातील ‘या’ व्यक्तीची प्रकृती गंभीर
यामध्येच आता सांगलीतील एका कांद्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या कांद्याला बाहुबली कांदा म्हणून संबोधत आहेत. त्याच कारण असं की हा तब्बल पाऊण किलो वजनाचा आहे. त्यामुळे याला भाऊबली कांदा म्हंटल जात आहे. पलूस तालुक्यामधील ब्रम्हनाळमधील हनुमंत शिरगावे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये कांद्याचे उत्पादन घेतले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अजित पवार विधानसभेत कडाडले; म्हणाले…
सांगलीच्या या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे सगळीकडे कौतुक होत असून हा कांदा पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे. कारण या शेतकऱ्याने कांद्यामध्ये भरघोस उत्पादन घेतले आहे. आणि यामध्येच एक खास गोष्ट म्हणजे एका कांद्याचे वजन तब्बल पाऊण किलो इतका भरत आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांची आक्रमक भूमिका; गळ्यात कांद्याची माळ घालून थेट विधान भवनात दाखल