
Viral News । लग्न (Marriage) हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खास क्षण आहे. प्रत्येकजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वचजण बोहल्यावर चढत आहेत. पण अनेकदा लग्नात असं काही होत की यामुळे नवरा-नवरीसह वऱ्हाडीदेखील शॉक होतात. सध्या अशीच एक घटना घडली आहे. (Latest marathi news)
Ajit Pawar । “म्हणून मी भाजपसोबत गेलो”, अखेर अजित पवार यांनी केला मोठा खुलासा
मध्य प्रदेशातील सीहोर शहरात हा प्रकार घडला आहे. वरासह वरातीतील इतर पाहुणेही नशेत लग्नाच्या मंडपात आले. इतकेच नाही तर त्यांनी वधूपक्षातील लोकांशी गैरवर्तन करून त्यांना मारहाण करून गाडीसह 5 लाख रुपयांची मागणी केली. या प्रकारामुळे संतापलेल्या नववधूने लग्नाला नकार दिला. वधूच्या या निर्णयामुळे वरातीला नवरीशिवायच माघारी जावं लागलं.
Sangli News । सांगलीच्या राजकारणातून धक्कादायक बातमी! माजी आमदाराच्या गाडीवर दगडफेक
या घटनेमुळे नववधूने कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वरातीत मद्यधुंद अवस्थेत नवरदेवाला पाहून वधूपक्षातील लोकही थक्क झाले होते. वराने वधूच्या कुटुंबीयांशी गैरवर्तन करत त्यांना मारहाण केली. शिवाय त्यांच्याकडे हुंडादेखील मागितला. सध्या या घटनेची सगळीकडे चर्चा होत आहे.
Sharad Pawar । अमित शहांबद्दल शरद पवारांचं धक्कादायक वक्तव्य म्हणाले, “त्यांना…”