
विज्ञान व तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. यामुळे आपल्या आजूबाजूला अनेक चमत्कार आपण पाहत असतो. वेगवेगळ्या मशीन आणि तंत्रज्ञाने आपल्याला नेहमी थक्क करत असतात. आजकाल अनेक ठिकाणी कामासाठी रोबोट ( Robot) वापरले जातात. आता तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल परंतु, दुबईमध्ये यावर्षी जगातील सर्वात पहिला रोबोट कॅफे (Robot Cafe) सुरू करण्यात येणार आहे.
राखी सावंत प्रेग्नेंट? मोठा खुलासा करत म्हणाली…
डोना सायबर कॅफे (Dona Cyber Cafe) असे या कॅफेचे नाव असणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कॅफे 24 तास सुरूच असणार आहे. हा कॅफे पूर्णपणे रोबोट ऑपरेटेड असणार आहे. यामुळे येथे एकही मनुष्य काम करताना दिसणार नाही. तुमची ऑर्डर घेण्यापासून ती ऑर्डर बनवून हातात देण्यापर्यंत सगळी कामे याठिकाणी रोबोटच करताना दिसणार आहेत.
ब्रेकिंग! सिन्नर- शिर्डी महामार्गावर भीषण अपघात
या सायबर कॅफे च्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कॅफेमध्ये काम करणारे रोबोट फक्त सामान्य रोबोट नसून ते सुपरमॉडेल रोबोट असणार आहेत. हे रोबोट आईस्क्रीम, कॉफी, स्नॅक्स पासून सगळ्या गोष्टी ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणार आहेत. याशिवाय या कॅफेमध्ये बसून जर कोणाला कंटाळा आला असेल तर हे सुपरमॉडेल रोबोट लोकांचे मनोरंजन देखील करणार आहेत.
“नेत्यावर बोट उचलण्यालायक काही नसलं की बायकोच्या मागे लागतात”; अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य