
मुंबई : करण जोहरचा ‘कॉफी विथ करण ७’ हा शो कायम चर्चेत असतो. या शोमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासे करत असतात. कारणही सेलिब्रेटींना बोलतं करत असतो. नुकतंच शोमध्ये बॉलिवूड शाहरुखची पत्नी गौरी खानने हजेरी लावली. गौरीसह तिच्या मैत्रिणी भावना पांडे आणि अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने देखील शोमध्ये सहभाग घेतला.
या शोमध्ये महीप कपूरने बॉलिवूडमधील लोकप्रिय रणवीर-दीपिका, रणबीर-आलिया, विकी-कतरिना या जोडींना एक सल्ला दिलाय . करणने महीपला रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणला लग्नानंतर कोणता सल्ला देशील असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत ती ” त्यांना चांगलं सेक्स करण्याचा आणि त्याबरोबरच कपडे शेअर न करण्याचा सल्ला देईन”.
का अपयशी ठरत आहेत भारतीय गोलंदाज धावसंख्येचा बचाव करण्यात? समोर आली कारणे..
नंतर करणने विचारले रणबीर-आलिया या जोडीला काय सल्ला देशील यावर महीप कपूर म्हणाली, “लग्नानंतर चांगलं सेक्स करा आणि त्याबरोबरच होणाऱ्या बाळाची दोघांनीही समानतेने जबाबदारी घ्या”. असं म्हणत महीप कपूरने अजून बऱ्याच प्रश्नांची खूप गमतीशीरपणे उत्तर दिली आहेत.