
रस्त्यावर नेहमी अपघात होत असतात. यामध्ये बऱ्याचदा एखाद्याला कळत-नकळत दूरपर्यंत फरपटत घेऊन जाण्याच्या घटना घडतात. मागील काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील एका तरुणीला कारसह 16 किलोमीटर दूर फरपटत न्हेण्याची घटना घडली होती. दरम्यान बंगळुरू येथे देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल ( Viral Video) होतोय.
आताची सर्वात मोठी बातमी! राखी सावंतला अटक
या व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगा दुचाकीसह मध्यमवयीन व्यक्तीला फरपटत घेऊन जात आहे. आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात ही बाब येताच त्या मुलाची गाडी अडवण्यात आली व लोकांनी त्याला चांगलेच ओरडायला सुरुवात केल्याचे या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. तसेच या मुलाची दुचाकी दुरावस्थेत असून त्याच्या गाडीचा नंबर देखील या व्हिडीओ मध्ये दिसतोय. हा व्हिडीओ ANI ने काल ( ता.17) प्रसिद्ध केला आहे.
#WATCH | Man being dragged behind a scooter on Bengaluru's Magadi road
— ANI (@ANI) January 17, 2023
The victim is currently under medical treatment a city hospital. The two-wheeler driver has been apprehended by the police at PS Govindaraj Nagar: DCP West Bengaluru
(Video verified by Police) pic.twitter.com/nntPxaZxSu
२३ जानेवारी २०२३ ला येतंय बाळासाहेब ठाकरेंबद्दल नाटक
बंगळुरू पोलिसांनी हा व्हिडिओ व्हेरिफाय केला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ खरा आहे. व्हिडीओमधील पीडित व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच फरपटत न्हेणाऱ्या तरुणाला पीएस गोविंदराज नगर येथून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती देखील ANI ने या व्हिडीओ सोबत दिली आहे.
पुणे सोलापूर हायवेवर भीषण अपघात; अपघातात श्रीगोंद्यातील ६ जण गंभीर जखमी