Viral News । वैद्यकीय क्षेत्राला (Medical field) धक्का देणारी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे डॉक्टरांसह सर्वचजण चकित झाले आहे. एका तरुणाचे पोट अचानक दुखू लागल्याने तो तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेला होता. त्यावेळी संबंधित डॉक्टरांना त्याच्या पोटावर एक व्रण आढळून आला. त्याबाबत त्या तरुणाला डॉक्टराने विचारपूस केली असता त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. अखेर डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा एक्सरे काढला. (Latest Marathi News)
Heavy Rain । क्षणात डोळ्यासमोरून वाहून गेलं सर्वकाही, मुसळधार पाऊस आणि ढगफुटीने जनजीवन विस्कळीत
यावेळी त्यांना त्या एक्सरेमध्ये असे काही सापडले की डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या तरुणाच्या पोटात डॉक्टरांना तपासणीवेळी 15 सेंटीमीटर लांबीचा चाकू (Knife found in abdomen) सापडला. त्यानंतर त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (Operation) यशस्वी पार पडली. विशेष म्हणजे चाकूमुळे इतर अवयवांना कोणतीही इजा झाली नव्हती.
शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर डॉक्टरांनी तरुणाची विचारपूस केली. त्यावेळी त्या तरुणाने आपल्या काही दिवसांपूर्वी चाकू हल्ला झाल्याची माहिती दिली. चाकू त्या तरुणाच्या पोटात आत शिरला होता. धक्कादायक बाब म्हणजे रक्तस्त्राव झाल्याने तो स्थानिक डॉक्टरांकडेही गेला, तेव्हा त्या डॉक्टराने तपासणी न करता जखमेवर टाके घातले. त्यामुळे तरुणाला त्रास होऊ लागला.
Government Hospital । शासकीय रूग्णालयात धक्कादायक प्रकार; पेशंटच्या खाटांवर कुत्रे करतायेत आराम