Site icon e लोकहित | Marathi News

एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात!

The young man who threatened to kill Eknath Shinde is in police custody!

मागच्या काही दिवसापासून अनेक राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.

अन् शेतकरी ढसाढसा रडू लागला; पीक नुकसानीची पाहणी करताना कृषिमंत्र्यासमोर घडला हा प्रकार

माहितीनुसार, पुण्यातील वारजे मधून हा फोन आल्याचं उघड झालं आहे. ११२ हेल्पलाईन क्रमांकावर हा फोन आला असल्याचं समजत आहे. “मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे” असे बोलून कॉल कट करण्यात आला आहे. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांना धमकीचा कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी

एकनाथ शिंदे यांना कॉल करून जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण हा दारुच्या नशेत होता. पहिल्यांदा त्याने अॅम्ब्युलन्ससाठी कॉल होता.मात्र अॅम्ब्युलन्स न आल्याने त्याने 112 कॉल करुन थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे.

गौतमी पाटीलच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांचा पुढाकार; म्हणाल्या, “गरीब घरातून…”

Spread the love
Exit mobile version